Gardening and Farming Care after heavy rains... ( घमासान पावसानंतर बागेची व शेतीची घेण्याची काळजी ...)

Care of gardening and agriculture after heavy rains: 

We now regularly see that it rains more and more every year. Areas that used to have similar droughts are now hailstorms; Cattle began to be sacrificed along with agriculture. This year, the clouds parted and swept away agriculture in many parts of the country, flooding households and disrupting life. Last year's Corona is still there today. It brought heavy rains and floods. 

But no matter what happened, the man had to stand up again and again, no matter what. This is life and this is nature.

 Main works to be done in garden / field due to heavy rains: 

1. Excessive moisture and humidity in the soil for a long period of time increases the risk of various fungal diseases in the soil as well as in the leaves,branches & other parts of trees or plants. In this case, the fungus, which is deep in the soil, easily penetrates the ground or the top layer of soil due to water and acts adversely on the ground parts as well as parts above the ground of the plant.


In the garden or in the field, many fungal & viral diseases are found, such as Root rot, Stalk rot, Damping off, Die-back Disease, Leaf Spot etc. And many more. In such cases, fungicides need to be applied in the soil (Drenching) by drip or in open water (Flood Irrigation) or in the soil in the garden, to control the incidence of fungal diseases or to reduce the damage. 

Due to excessive rainfall, fertilizers and plant protection measures mixed with soil in farm lands as well as in home gardens, in pots, go deep into the soil or are carried away by excess water, alternative plants / crops become deficient in fertilizers and turn yellow. In such cases, the garden needs nitrogenous fertilizers. But in this case, not only nitrogenous fertilizers but also micro-nutrient based fertilizers can be applied to avoid damage to the plants (fruits, flowers) and crops by avoiding the symptoms of subsequent deficiencies. 

 It is also necessary to spray fungicide on all plants / crops after rains. At least 2 sprays should be done at intervals of 10 to 15 days as per requirement / outbreak. Now whether fertilizers and pesticides should be used chemically or organically is a personal matter and it depends on the methods of cultivating the garden. If it is edible like orchards, vegetables or other edibles, it will be more beneficial to use organic fertilizers and medicines on it. And if the plants are flowering or ornamental, then if the incidence is high, then using chemical fertilizers or medicines is not a big problem. But far from it, organic gardening or farming will always be more appropriate. 

 2. Excessive rainfall causes more weeds / grass to grow in the garden / field than usual. 

In such cases, if the exposure to rain is intermittent, then use herbicides. But if the rains are continuous, then the use of herbicides is not very useful and the weeds in the garden grow in large numbers. In this case, it is more beneficial to uproot the weeds in the garden by oneself or with the help of farm-labors. The grass should be used either as a mulch in the garden or in the field or in the garden itself by making compost. 


Such home-made compost is very useful for plants. In this way the grass in the garden is destroyed and the competition with the main plants / crops for essential nutrients in the garden is reduced and it helps in proper nutrition of the useful plants. 

 

 3. Pruning & Training : Often due to excessive rainfall / water the nitrogen plants / crops in the soil get dissolved quickly and get more quantity in less time and the plants grow more and unnecessarily. Symptoms of fungal diseases also appear on the trees. In such cases, diseased or dampened branches, fruits, flowers and other parts of the trees should be pruned or removed and destroyed by deep burial in the soil so that it does not cause further damage to the garden or farm. If there are orchards or ornamental trees, it is important to prune them and train the trees. In such cases, apply medicine in the soil and spray but do not apply fertilizers. Pruning should be given later, so that it is more suitable for the new growth of the plant. Do not forget to spray a fungicide after pruning.

4. Pest control: 

Improper environment increases the incidence of many pests. Such as; Plant Hoppers in Paddy, caterpillars etc such and many insects cause a lot of damage to trees / crops. In case of such outbreaks, it is necessary to spray the appropriate pesticide.Integrated pest control system too helps in controlling or eradicating these unwanted pests.

 After heavy rains, it is necessary to take care of these / above major things in the garden / field. 

Fungicides, pesticides, as well as various essential fertilizers all vary according to the flag and the crop, so it is difficult to write about them here. But if you have any queries or questions about your garden, you can let me know in the comments box. I will definitely try to solve your problem. Until then, keep gardening.  

Prafull Borse,

HORTICULTURIST

YouTUBE: Garden care during Heavy rains...   

   

घमासान पावसानंतर बागेची व शेतीची घेण्याची काळजी  :

आपण आता नियमित बघतोय कि दरवर्षी पाऊस हा वेळी अवेळी जास्त पडतोय . ज्या भागांत सारखा दुष्काळ असायचा तिथे आता गारपीट होतेय; शेतीसोबत गुरं-ढोरं बळी जाऊ लागलेत. ह्या वर्षी तर ढग फुटीहि होऊन बऱ्याच भागांत शेती वाहून गेली, घरादारांत पाणी साचले ,जीवन विस्कळीत झाले . मागच्या वर्षीचा कोरोना आजही आहेच. त्यात अति पाऊस अन महापूर संकटांचा डोंगर घेऊन आला.

पण काहीही झालं तरी माणसानं  काय अन  झाडाझुडपांनी काय , पुन्हा पुन्हा उभं राहायचं. हेच ते जीवन आणि हाच काय तो निसर्ग.

अति पावसामुळे बागेत /शेतात करावयाची मुख्य कामे :

१. मातीत जास्त काळ प्रमाणापेक्षा जास्त ओलावा ( किव्वा पाणी तुंबणे ) व वातावरणात आद्रता झाल्यास मातीत तसेच झाडा पानांवर विविध बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्य्ची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अश्यावेळी मातीत खोलवर असणारी बुरशी पाण्यामुळे जमिनीवर किव्वा मातीच्या वरच्या स्तरात अगदी सहजपणे येते आणि ती झाडाच्या जमिनीवरील भागांवर अपायकारकरित्या कृती करते.


बागेत किव्वा शेतात अनेक बुरशीजन्य विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो जसे, मूळकूज, देठ कूज , ड्याम्पिंग ऑफ, डाय बॅक रोग (मर रोग ), लीफ स्पॉट (पानांवरील डाग ) इ. व असे अनेक. अश्यावेळी बुरशीनाशके जमिनीत ड्रीपवाटे किव्वा मोकाटपाण्यावाटे  अथवा बागेत मातीत देणे गरजेचे असते, जेणेकरून बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावास आळा बसेल किव्वा नुकसान कमी होईल. 

अति पावसामुळे ह्या अगोदर शेत जमिनीत तसेच घरगुती बागेत, कुंड्यांत मातिती मिसळलेली खाते व औषधे अति पाण्याने जमिनीत खोलवर जातात किव्वा वाहून जातात , पर्यायी झाडांस / पिकास खतांची कमतरता भासू लागते व ते पिवळी पडू लागतात. अश्यावेळी बागेला नत्रयुक्त खतांची आवश्यक्यता असते. परंतु अश्यावेळी फक्त नत्रयुक्त खते न देता त्यासोबत सूक्शम अन्नद्रव्य युक्त खतांचीही एक मात्रा दिल्यास झाडांवर ( फळांवर , फुलांवर ), पिकावर अश्या परिस्थितीतनंतर उद्भवणारे कमतरतेची लक्षणे टाळून नुकसान टळते. 

तसेच पाऊस ओसरल्यावर सर्व झाडांवर / पिकावर बुरशीनाशकाची फवारणी करने आवश्यक असते. किमान २ फवारण्या १० ते १५ दिवसांच्या फरकाने किव्वा गरजेनुसार / प्रादुर्भावावर करणे आवश्यक आहे.

आता खते व औषधे रासायनिक वापरावीत किव्वा सेंद्रिय हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असून तो बाग जोपासण्याच्या पद्धतींवर अवलंबून आहे. जसे फळबाग ,भाजीपाला किव्वा इतर खाण्याजोगे असल्यास त्यावर सेंद्रिय खते व औषधे यांचा वापर करणे दूरदृष्टीकिनातून अधिक फायद्याचे ठरेल.  आणि जर का झाडे फुलयुक्त किव्वा शोभेची असतील तर त्यात प्रादुर्भाव अधिक असल्यास रासयनिक खते किव्वा औषधे यांचा वापर केल्यास हि तशी फारशी हरकत नाही. परंतु दूरच विचार करता ऑरगॅनिक गार्डेनिन्ग किव्वा फार्मिंग कधीही नेहमी जास्त योग्य असेल.

२. अति पावसामुळे बागेत /शेतात नेहमीपेक्षा जास्त तण/ गवत वाढते . अश्या परिस्थितीत जर पावसाची उघडीप अधून मधून मिळत असेल तर तणनाशकाचा वापर करावा. परंतु जर पाऊस संततधार असेल तर अश्यात तणनाशकाचा वापर फारसा उपयुक्त ठरत नाही व बागेतील तण मोठ्या प्रमाणात वाढते. अश्यावेळी स्वतः किव्वा शेत मजुरांच्या सहाय्याने बागेतील तण मुळासकट उपटणे जास्त फायद्याचे असते. ते गवत एकतर बागेत आच्छादन म्हणून वापरू शेतात किव्वा बागेतच कंपोस्ट बनवून त्याचे खत बनवावे.  

असे घरगुती बनविलेले कंपोस्ट खत झाडांस फार उपयुक्त असते . अश्या रीतीने बागेतील गवत हि नष्ट होते व बागेत आवश्यक अन्नद्रव्व्यासाठी मुख्य झाडां/ पिकांसोबत ची  स्पर्धा कमी होऊन उपयुक्त झाडांचे पोषण व्यवस्थित होण्यास मदत होते.

३. रोगट/ अतिरिक्त फांद्या छाटणे  : बर्याचवेळी अति पावसामुळे / पाण्यामुळे  जमिनीतील नत्र झाडांस / पिकांस लवकर विद्राव्य स्वरूपात येऊन कमीवेळात जास्त मात्रेत मिळते व झाडांची अधिक व अनावश्यक वाढ होते. तसेच झाडांवर बुरशीजन्य रोगाचे लक्षणे हि दिसतात, अश्या वेळी झाडांची रोगट फांद्या , फळे , फुले व इतर भाग छाटूण   जमिनीत खोलवर पुरावे किव्वा जाळून नष्ट करावे जेणेकरून त्यामुळे बागेला अधिक नुकसान होणार नाही. फळबागा किव्वा शोभेची झाडे असल्यास त्यांची छाटणी ( प्रूनिंग )  करून झाडांचे आकार ( ट्रेनिंग ) नेटके करणे  के महत्वाचे काम असते. अश्यावेळी औषधे जमिनीत देणे व फवारणी करावी परंतु खते मात्र देऊ नयेत. छाटणी नंतर द्यावेत , जेणेकरून झाडांची नवीन आवश्यक वाढ होण्यास ते जास्त उपयुक्त ठरते. छाटणी नंतर एक बुरशीनाशकाची फवारणी करणे विसरू नये.

४. कीड नियंत्रण : अयोग्य वातावरणामुळे बऱ्याच अपायकाराम किडींचा प्रादुर्भाव वाढतो. जसे ; प्लांट हॉप्पर्स (भात पीक), अळ्या अश्या व अनेक किडींमुळे झाडांस / पिकास बरीच हानी होते. अश्यावेळी झालेल्या प्रादुर्भावावर योग्य त्या कीडनाशकाची फवारणी करणे गरजेचे असते. एकात्मिक कीड नियंत्रण प्रणालीने हि अनावश्यक कीड नियंत्रणात किव्वा आटोक्यात आणण्यात येते.

अति पावसानंतर ह्या / वरील प्रमुख गोष्टींची बागेत / शेतात देखरेख करणे गरजेचे आहे .
बुरशीनाशके , कीडनाशके , तसेच विविध आवश्यक खते ह्या सर्व गोष्टी झांडांनुसार व  पिकानुसार भिन्न भिन्न असतात त्यामुळे त्या येथे लिहिणे तसे अवघड आहे . परंतु तुम्हाला तुमच्या बागेतील काही शंका किव्वा प्रश्न असतील तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकता . मी तुमचे प्रश्न सोडविण्याचा नक्की प्रयत्न करिन . तोपर्यंत बागकाम एन्जॉय करीत रहा.. 

प्रफुल्ल बोरसे;

www.BeoGardens.com 

YouTUBE : अति पावसात घ्यायची बागेची काळजी ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या