तुमच्याकडे बाल्कनी किंवा टेरेस गार्डन असल्यास, तुम्ही कंटेनर गार्डनिंगसाठी योग्य असलेल्या विविध भाज्या वाढवू शकता. बाल्कनी किंवा टेरेस गार्डन्स लागवडीसाठी मर्यादित जागा देतात, परंतु तरीही तुम्ही विविध प्रकारच्या भाज्या आणि औषधी वनस्पती वाढवू शकता. येथे काही भाज्या आहेत ज्या बाल्कनी किंवा टेरेस गार्डनमध्ये वाढण्यास योग्य आहेत:
(कोशिंबिरींच्या व पालेभाज्यांविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
( वेलवर्गीयभाज्या म्हणजे काय? भाज्यांविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
(चेरी टोमॅटो व पॅटिओ टोमॅटो यावर अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
(बेल पेपर्स यावर अधिक माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्स मध्ये जरूर तसे नमूद करा.. मी तुमच्यासाठी त्याविषयी सविस्तर लेख लिहीन..)
वांगी : हिरवे किव्वा भरताचे वांगे देखील बाल्कनी किव्वा टेरेस गार्डन मध्ये अगदी चांगल्या प्रकारे उगविता येतात. वांगी, टोमॅटो यांसारख्या भाजी किव्वा फळवर्गीय भाजीपाला लागवड करतांना अश्या रोपांना (झुडपांना ) फळधारणेनंतर दोरीच्या साहाय्याने आधार देण्याची गरज असते जेणेकरून ते नाजूक झुडूप/ झाड त्या फळ भाज्यांचे वजनाने ते वाकणार कोवा मोडणार नाहीत.
स्कॅलियन्स :
स्कॅलियन्स किंवा छोटे हिरवे कांदे लहान बागांसाठी उत्तम भाजीपाल्यांपैकी एक आहे. ते लहान पॉट्स किंवा अगदी रि-यूज्ड कंटेनर मध्ये घेतले जाऊ शकते.
एक्सझोटीक (विदेशी) भाजीपाला : विशिष्ट प्रदेशात कमी प्रमाणात आढळणाऱ्या किंवा पिकवल्या जाणार्या वाणांचा संदर्भ देतात, जे स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये नवीनता आणि अद्वितीय चव जोडतात. विदेशी भाज्यांची काही उदाहरणे येथे आहेत; आर्टिचोक , शतावरी , बडीशोप , बेबी बॉकचॉय, ड्रॅगन फ्रूट, कोहलरबी इ.
(एक्सझोटीक (विदेशी) भाजीपाला काय व त्याचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती)
(औषधी वनस्पतींविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
गाजर : कंटेनर बागकामासाठी गाजराचे लहान (ड्वार्फ) वाण निवडा. त्यांना पाण्याचा निचरा होणारी माती लागते आणि ती खोल कुंडीत किंवा इतर तत्सम पॉट्समध्ये वाढवता येते.
(मुळवर्गीय भाज्यांविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
मुळा : मुळा या जलद वाढणाऱ्या मूळ भाज्या आहेत ज्या लहान जागेत वाढवल्या जाऊ शकतात. ते कंटेनरसाठी योग्य आहेत आणि काही आठवड्यांत त्यांची कापणी केली जाऊ शकते. ह्यात तुम्ही मुळा पालेभाजीसाठी उगवू शकता किव्वा मुळा ह्या मूळभाजीसाठी देखील. परंतु ज्यावेळी मूळ भाजी म्हणून उगवणार त्यावेळी कंटेनर्स थोडे खोलगट घ्यावे तसेच भाज्यांची लागवड करतांना त्यातील माती सहसा नीट काळजीपूर्वक कंटेनर्स मध्ये भरावी जेणेकरून त्यात खडे किव्वा दगडगोटे नसतील याची काळजी घ्यावी. जेणेकरून मुळवर्गीय भाज्यांची वाढ उत्तम होईल .
(मुळवर्गीय भाज्यांविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
मायक्रो ग्रीन्स :
मायक्रोग्रीन्स भाज्या या कोवळ्या, नाजूक हिरव्या भाज्या आहेत ज्यांची कापणी सुरुवातीच्या टप्प्यावर केली जाते. ते लहान (उथळ ) ट्रे किंवा कंटेनरमध्ये वाढवता येतात आणि त्यात केल, मोहरी आणि मुळा सारख्या जातींचा समावेश होतो.
(मायक्रो ग्रीन्सविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
बिन्स :
बुश बीन्स किंवा बिन्सचे इतर प्रकार, जसे की फ्रेंच बीन्स किंवा ग्रीन बीन्स, कंटेनर्स किंवा डब्यात आधारासह वाढू शकतात. त्यांची वाढ जोमाने होते व त्यांना शेंगा मोठ्या प्रमाणात येतात, त्यांचे उत्पन्न अगदी मुबलक असते.
(बिन्स भाज्यांविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
(काकडीवर्गीय भाज्यांविषयी अधिक माहितीसाठी क्लीक करा...)
भाजीपाला पिकांवरील कीड,रोगराई व त्यांचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी पुढील ब्लॉग वाचा..
0 टिप्पण्या